शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कलाब्धि महोत्सवास प्रारंभ, पोलीस उद्यान बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 3:39 PM

अभिजात भारतीय कलाविष्काराने कलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला.

ठळक मुद्देकलाब्धि महोत्सवास प्रारंभपोलीस उद्यान बहरले

कोल्हापूर : अभिजात भारतीय कलाविष्कारानेकलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला.

लघुचित्र शैली, वारली पेंटींग, निसर्ग चित्र, अ‍ॅक्रॅलिक,शिल्पकला, टेराकोटा, कागदकाम, क्लॉथ पेंटींग, हस्तकला, मांडणी शिल्प, मंदिर स्थापत्य शैली या कलांचे वैश्विक रुप यानिमित्ताने उलगडले.महोत्सवाचे उदघाटन पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रीमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपूगडे उपस्थित होते. भारतीयत्व ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.यानंतर उद्यानाच्या हिरवळीत आणि झाडांच्या आच्छादनात भारतीय कलापरंपरा आकाराला येवू लागला. देशातील विविध भागातून आलेले कलावंत आपली कला या कलानगरीच्या रंगमंचावर सादर करत होते. महात्मा गांधींच्या काठीपासून ते भारताचे वैविध्यरुपांचे दर्शन घडवणारे, लेकुरवाळी विठू माऊली, प्राणी, व्यक्तिशिल्प नजर खिळवून ठेवणारे होते. दुसरीकडे कागदकामची कार्यशाळा सुरू होती. एकीकडे शालेय विद्यार्थी मांडणी शिल्प करण्यात गुंतले होते. यानंतर शिल्प स्पर्धा, प्रत्यक्षशिल्प स्पर्धा, शालेय मुलांचे मांडणी शिल्प, छायाचित्रण स्पर्धा अशा विविध स्पर्धा झाल्या.

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर