दीपोत्सवाने उजळली ‘प्रभात तुतारी’, यशवंत भालकर फौंडेशनचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:45 IST2019-06-04T17:42:54+5:302019-06-04T17:45:22+5:30
प्रभात फिल्म कंपनीच्या ९०व्या वर्धापनदिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनच्या वतीने कोळेकर तिकटी येथील ‘प्रभात तुतारी’ला दीपोत्सवाने उजळविण्यात आले. यावेळी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, माजी नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते.

कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त यशवंत भालकर फौंडेशनच्या वतीने कोळेकर तिकटी येथील ‘प्रभात तुतारी’ला दीपोत्सवाने उजळविण्यात आले.
कोल्हापूर : प्रभात फिल्म कंपनीच्या ९०व्या वर्धापनदिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनच्या वतीने कोळेकर तिकटी येथील ‘प्रभात तुतारी’ला दीपोत्सवाने उजळविण्यात आले. यावेळी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, माजी नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ कलाकार वेशभूषाकार शाम कांबळे, निर्मिती व्यवस्थापक राजाराम बापू, नृत्यदिग्दर्शिका हेमसुवर्णा मिरजकर, नृत्यदिग्दर्शक सुनील माजगावकर, मर्दानी खेळ अभ्यासक बाबासो लबकरी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष संदीप भालकर, उपाध्यक्षा सपना जाधव, खजानीस संदीप जाधव, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर तसेच कला अकादमीचे कलाकार उपस्थित होते. या उपक्रमासाठी सावली गुलमोहर ग्रुपचे सहकार्य लाभले.