इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील डेफ स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय यळरूटे होते. यावेळी डी. एम. कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मान्यवरांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कलाशिक्षक संजय काशीद यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मास्क व पुष्पगुच्छ दिले. यावेळी दीपक निंगुडगेकर, आनंदा रणदिवे, प्रांजली माने, विश्वराध्य होनमुर्गीकर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता पाटील यांनी केले. सुहास गायकवाड यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
०३१२२०२०-आयसीएच-०४
तिळवणी (ता.हातकणंगले) येथील रोटरी डेफ स्कूलमध्ये मान्यवरांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.