Celebrate the 5th birthday of a bullet train! | दुचाकीचा असाही ५० वा वाढदिवस साजरा, गावातून मारला फेरफटका-कापला केक

शिरोली दुमाला ( ता करवीर ) येथे जेष्ठ सहकार नेते विश्वासराव पाटील यांनी केला बुलेट गाडी चा ५०वा वाढदिवस भाटामाटात रविवारी रात्री साजरा केला . यावेळी ५०बुलेट मालक कार्यकर्त उपस्थितीत होते . छाया राज मकानदार

ठळक मुद्देजेष्ठ सहकार व कॉग्रेस नेते विश्वासराव पाटील यांनी रविवारी रात्री शिरोली दुमाला ( ता. करवीर ) गावात भव्य रॉलीद्वारे थाटामाटात साजरा केला .

सावरवाडी : इंटरनेट, व्हॉट्सअप युगात सध्या कोण कशाचा वाढदिवस साजरा करेल यांचा नेम नाही . गेली पाच दशके कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकिय सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या गोकूळ दुध संघाचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आपल्या स्वतःच्या बुलेट गाडी चा ५०वा वाढदिवस रविवारी रात्री शिरोली दुमाला ( ता. करवीर ) गावात भव्य रॉलीद्वारे थाटामाटात साजरा केला .

        विश्वासराव पाटील यांनी वयाच्या १९ व्या वर्षी  दि . १० नोंव्हेंबर १९६९ साली एम एच के ६९२२ नंबरची साडेचार हजार रूपयेला खरेदी केली . त्यावेळी तात्कालीन सिंडीकेट बँकेतून कर्ज काढून ही बुलेट घेतली -आणि ही बुलेट त्यांना लकी लागली . त्यावेळी त्यांची शिरोली दुमाला गावचे उपसरपंचपदी निवड झाली . बुलेट गाडी खानदानाचा मान असतो  त्यावेळी पेट्रोल दर एक रूपये २५ पैसे होता . त्यांनंतर त्यांनी करवीर पंचायत समितीच्या राजकारणात प्रवेश केला . पुढे माजी कृषिमंत्री कै श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या माध्यमातून कॉग्रेस पक्ष संघटनेत प्रवेश केला .गोकूळ दुध संघाच्या राजकारणात प्रवेश केला . रयत संघ,इफको खत संघ कुंभी कासारी साखर कारखाना आदि क्षेत्रात यश मिळविले . घरची लक्ष्मी म्हणून बुलेट गाडी गेली ५० वर्ष जपून वापर करीत होते . विश्वासराव पाटील यांचे भाऊ तुकाराम पाटील मुलगा सचिन, पुतणे सुनिल, राहूल, यांनी ही बुलेट चालविली . पाटील घराण्याची शान म्हणून तीची देखभाल ही वेळ वर केली .

        या बुलेट गाडीला ५० वर्ष पूर्ण झाल्याने भागातील ५० बुलेट मालकांच्या ताफ्यासहीत बीडशेड ते शिरोली दुमाला गावापर्यत भव्य रॉली काढण्यात आली . संध्याकाळी सात वाजता पाटील परिवारातर्फ या बुलेटचे पुजन करण्यात आले नंतर सर्व नातवंड यांच्या हस्ते केक कापून भव्य आतषबाजी करून बुलेटगाडी चा ५०वा वाढदिवस हजारो कार्यकरत्याच्या साक्षीने साजरा करण्यात आला . यावेळी ५० बुलेट गाडीमालकांचा कोल्हापुर फेटा बांधून गौरव करण्यात आला .

             यावेळी जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपसभापती शामराव सुर्यवंशी तुकाराम पाटील, माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस के पाटील अनिल सोलापुरे, सचिन पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, माधव पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, विलास पाटील संग्राम जाधव, हभप शहाजी खोत, यांच्यासह हजारो कार्यकर्त उपस्थितीत होते .
 

 

 बुलेट गाडी खरेदी करून ५० वर्ष पूर्ण झाले !
पाटील घराण्यात बुलेट गाडी घेऊन ५० वर्षाचा कालखंड झाल्याने कुंटूबांनी बुलेट गाडी चा५०वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले . घरची लक्ष्मी म्हणून आमची तिसरी पिढी ही बुलेट गाडी चालवितात . आणि बुलेटचा वाढदिवस भाटामाटात आम्ही साजरा केला . --- विश्वासराव पाटील, जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष गोकूळ दुध संघ,


 

Web Title: Celebrate the 5th birthday of a bullet train!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.