शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

गांधीनगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

By admin | Updated: March 3, 2016 00:29 IST

गुन्हेगारी प्रमाणात वाढ : चोऱ्या, किरकोळ गुन्ह्यांवर पाळत ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक

बाबासाहेब नेर्ले --गांधीनगर -व्यापाऱ्याचे अपहरण, चोरी, भुरट्या चोरी, मटका आणि अवैध धंद्यांमुळे गांधीनगर बाजारपेठेत वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारीविषयक घटनांना आळा घालण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. व्यापारी पेठेत किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागल्याने कापड नगरीतील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चांगला पर्याय ठरणार असून, लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यासाठी व्यापारी व अन्य व्यावसायिकांनी पुढे येणे अपेक्षित आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कापड बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे व चिंचवाड या पाच गावच्या हद्दीत ही व्यापारीपेठ विस्तारली आहे. या व्यापारी केंद्रात कापड व्यवसायाबरोबरच प्लास्टिक, कटलरी, होजिअरी अनेक छोटेमोठे उद्योग विस्तारत आहेत. जिद्दीने, कष्टाने येथील व्यापारी व्यवसाय करीत आहेत; पण ‘आयत्या बिळात नागोबा’ या म्हणीप्रमाणेच काहीजण व्यापाऱ्यांना त्रास देतात. चोऱ्या, अपहरण, चेनस्नॅचिंग या घटनांना येथील व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपहरण, चोऱ्यासारख्या घटना घडूनही काही व्यापारी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पोलिसांनाही अशा गुन्ह्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा गुन्हेगारांचे फावते आहे.दोन वर्षांत तीन अपहरणाच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोठ्या व्यावसायिकांनाच टार्गेट करण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटना ताजी होती तेव्हा अनेक व्यापारी व व्यावसायिकांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला; पण त्याला म्हणावी तितकी गती मिळाली नाही. होलसेल संघ, रिटेल व्यापारी संघ तसेच अन्य संघटना यांच्या मदतीने व सीसीटीव्हीच्या आधारे असे वाढते गुन्हे रोखता येतील; पण त्याची गंभीरता लक्षात येणे गरजेचे आहे.एक महिन्यापूर्वी गांधीनगरातील एका व्यापाऱ्याचे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना अपहरण झाले. त्यामुळे गांधीनगर व्यापारीपेठेत भीतीचे वातावरण पसरले. अनेक व्यापारी हे मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळू लागले. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना कमी करावयाच्या असल्यास अशा घटनांवर चाप आणला पाहिजे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. सीसीटीव्ही बसविल्याने अनेक गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल. गर्दीच्या ठिकाणी होणारी पाकीटमारी, किरकोळ वाद, महिलांची होणारी टिंगलटवाळी, चोरीच्या घटना, या सर्व बाबींवर अंकुश ठेवणे सहज शक्य होईल. तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे गेट हा मुख्य रस्ता तसेच शेरू चौक, सिंधू मार्केट, रेल्वे स्थानक, भाजी मंडई, गुरुनानक पेट्रोल पंप, अशा वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे.यासाठी येथील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन या सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यापारी पेठेवर सीसीटीव्हीचा वॉच राहिला तर अशा दुर्घटनांपासून गांधीनगर बाजारपेठ सुरक्षित राहील. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात मदत होईल. +परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेतच; पण ती कशी टाळता येईल या बाबींकडे लक्ष केंद्रित करून उपाय योजना करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. - संभाजी गायकवाडसहायक पोलीस निरीक्षकगांधीनगर पोलीस ठाणे.वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधीनगरमध्ये सीसीटीव्हीची गरज आहेच. त्या बाबतीत सर्व होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला तर गांधीनगर खरोखरच भयमुक्त होईल. - सुरेश आहुजाव्यापारी गांधीनगरवाहतुकीच्या दृष्टीने गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांमध्ये गुन्हेगारींची दहशत आहे. त्यामुळे बिनधास्त फिरणे अवघड झाले आहे.- रमेश वाच्छाणीव्यापारी, गांधीनगर.