‘कुंभी’वर आजपासून काेविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:45+5:302021-05-08T04:25:45+5:30

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखाना, पंचायत समिती करवीर व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आज, शनिवारपासून डी. सी. नरके ...

Cavid Center on ‘Kumbhi’ starts from today | ‘कुंभी’वर आजपासून काेविड सेंटर सुरू

‘कुंभी’वर आजपासून काेविड सेंटर सुरू

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखाना, पंचायत समिती करवीर व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आज, शनिवारपासून डी. सी. नरके विद्यानिकेतन येथे कोविड सेंटर सुरू होत आहे. १२० बेड क्षमतेच्या या सेंटरमध्ये २० ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथे पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचा पाठपुरावा व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुृढाकाराने येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यामुळे करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील रुग्णांवर तिथे उपचार होऊ शकले. सध्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यात रुग्णांवर उपचारासाठी बेड मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. यासाठी डी. सी. नरके विद्यानिकेतनमध्ये कोविड सेंटर सुरू होत आहे. आजपासून १२० बेडचे सेंटर सुरू होणार असून यामध्ये २० ऑक्सिजनच्या बेडची सुविधा आहे.

कोट-

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत, परिस्थिती भयानक आहे, यासाठी करवीरच्या पश्चिमेकडील रुग्णांसाठी कुंभी कारखाना येथे कोविड सेंटर सुरू होत आहे.

- राजेंद्र सूर्यवंशी (माजी सभापती, करवीर)

Web Title: Cavid Center on ‘Kumbhi’ starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.