दानोळी येथे विहिरीत मगर पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:19+5:302021-08-15T04:26:19+5:30
: येथील दानोळी कवठेसार मार्गावरील बाबासाहेब जमादार यांच्या विहिरीत सहा फुटी मगर पकडण्यात आली. यासाठी जयसिंगपूरच्या वाइल्ड लाईफ कंझर्व्हेशन ...

दानोळी येथे विहिरीत मगर पकडली
: येथील दानोळी कवठेसार मार्गावरील बाबासाहेब जमादार यांच्या विहिरीत सहा फुटी मगर पकडण्यात आली. यासाठी जयसिंगपूरच्या वाइल्ड लाईफ कंझर्व्हेशन टीमने शर्तीचे प्रयत्न केले.
वारणा नदीमध्ये अनेक मगर असून महापुरामुळे पाण्याची पातळी वाढेल तशी त्या अगदी गावापर्यंत ही पोहोचल्या होत्या. त्यातील एक मगर जमादार यांच्या विहिरीत शुक्रवारी दिसली. त्यानंतर याची माहिती जयसिंगपूरच्या वाइल्ड लाईफ कंझर्व्हेशन टीमला देण्यात आली. पाण्याने भरलेल्या विहिरीत मगर पकडण्यास अडचणी येऊ लागल्याने विहिरीतील पाणी उपसा करण्यात आला.
अभिजित खामकर, शुभम रास्ते, साई रसाळ, सचिन सुरवसे शाहरुख मुजावर निरंजन यादव, सुमित धोत्रे, दिलीप कांबळे, राम पडियार आणि दानोळीचे दिवाकर तिवडे यांनी मोठ्या प्रयत्नाने सहा फुटी मगर पकडली त्यानंतर मगरीला सुखरूप सोडण्यात आले. या विहिरीत मगर सापडली आहे ही बातमी समजताच मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
१४ दानोळी मगर
फोटो: जयसिंगपूरच्या वाइल्ड लाईफ कंझर्व्हेशन टीमने पकडलेली मगर