- संदीप आडनाईक कोल्हापूर - दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट करून विद्युत रोषणाईसाठी मोठ्या आकाराचे नियमबाह्य स्ट्रक्चर वापरणे १८ मंडळांना भोवले. जुना राजवाडा पोलिसांनी १८ मंडळांचे अध्यक्ष, डीजेमालक आणि स्ट्रक्चरमालक अशा ५४ जणांवर रविवारी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले असून, अनेक तरुणांचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. शनिवारी विसर्जन मिरवणूकीमध्ये १७ मंडळांचे साउंड मिक्सरही पोलिसांनी जप्त केले आहेत.
याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवसेन सर्जेराव पाटील (वय ३६ ) यांनी दिली. आगमनाच्या मिरवणुकीत मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्याने नवरात्रौत्सवानंतर विसर्जन मिरवणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात होती. मात्र, मंडळांनी पोलिसांचे आदेश धुडकावत शनिवारी मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून इराणी खणीकडे निघालेल्या दुर्गामाता मुर्तीच्या विसर्जन मिरवणूकीत १९ मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. यासाठी प्रेशर मिड तंत्राचा वापर केला. अवाढव्य आकाराचे स्ट्रक्चर उभे करून रस्ते अडवले. तसेच काही मंडळांनी गर्दीत स्मोकरमधून कार्बनडाय ऑक्साइड सोडून उपस्थितांच्या जीविताला धोका निर्माण केला. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर उभे करून रस्ते अडवणे, प्रेशर मिडचा वापर केल्याबद्दल कलम २२३ आणि २८५ सह पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) २००० अन्वये कलम १५ आणि १९ नुसार गुन्हे दाखल केले. दरम्यान मिरवणूकीमध्ये साउंड सिस्टीम वापरुन आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ९ मंडळांवर तर ९ मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. प्रशासनाने ठरवून दिलेली स्ट्रक्चरच्या लांबी रुंदीचे उल्लंघन या मंडळांनी केले.
डीजेमालक, स्ट्रक्चर मालकांवरही गुन्हे दाखलसचिन पवार, अध्यक्ष, प्रसाद तरुण मंडळ, अनोळखी डीजेमालक, सत्यम पाटील, स्ट्रक्चर मालक, अनुप सकटे, अध्यक्ष, सत्यप्रकाश तरुण मंडळ, अनोळखी डीजेमालक, वेदांत जितकर, स्ट्रक्चर मालक, सुशांत पाटील, अध्यक्ष, तटाकडील तालीम मंडळ, पांडुरंग पोवार डीजेमालक, तेजस चौगले, स्ट्रक्चर मालक, हर्षद आवळे, अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ वारे क्साहत, अनोळखी डीजेमालक, रमाकांत कांबळे, स्ट्रक्चर मालक, सुजल जाधव, अध्यक्ष, दत्त तरुण मंडळ, डीजेमालक श्रीकांत पाटील, स्ट्रक्चर मालक पियुष शिंदे, अश्विन बोगर, अध्यक्ष, बेकहॅम ग्रुप रामकृष्ण गल्ली, डीजे मालक कार्तिक, स्ट्रक्चर मालक विनोद कोईगडे, विकास पाटील, अध्यक्ष श्री महागणपती ग्रुप शहाजी वसाहत, डीजेमालक शुभम पाटील, स्ट्रक्चर मालक अभिजित कोंडेकर, सागर पाथरुट, अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, टिंबर मार्केट नगर, डीजेमालक चेतन गळवे, स्ट्रक्चर मालक साहील पाटील, प्रकाश नलवडे, अध्यक्ष, बालाजी पार्क मित्र मंडळ, डीजेमालक अभिजित पाटील, स्ट्रक्चर मालक रवि राठोड, सोमेश चौगले, अध्यक्ष, मस्कुती हायकर्स प्रणित जॉन संघटना, डीजेमालक पार्थ भोसले, स्ट्रक्चर मालक विजय कांबळे, आदित्य पोतदार, अध्यक्ष, रंकोबा तालीम मंडळ, अनोळखी डीजेमालक, स्ट्रक्चर मालक गणेश कदम, सूरज आवळे, अध्यक्ष, गोल्डन बॉईज, जवाहर नगर, डीजेमालक तरबेज शेख, स्ट्रक्चर मालक अक्षय मोरे, कैलास सकटे, अध्यक्ष, न्यु एकता तरुण मंडळ, डीजेमालक चिनु नाईक, अनोळखी स्ट्रक्चर मालक, प्रथमेश कुरपे, अध्यक्ष, तुरबत चौक, मंगळवार पेठ, डीजेमालक मयुर करपे, स्ट्रक्चर मालक-विशाल चौगले, गणेश गजरे, अध्यक्ष, श्री मरगाई तरुण मंडळ, डीजेमालक संदेश पाटील, स्ट्रक्चर मालक-विघ्नहर्ता लाईट, यश माळी, अध्यक्ष, पॉलीटीक्स ग्रुप, डीजेमालक शैलेश पाटील, अनोळखी स्ट्रक्चर मालक, भोला पवार, अध्यक्ष शिवप्रेमी मित्र मंडळ विचारेमाळ, शाहुपुरी, डीजेमालक अभिजित कांबळे, अनोळखी स्ट्रक्चर मालक, रोहित चव्हाण, अध्यक्ष, शाहुपुरी किंग, डीजेमालक आकाश देसाई, स्ट्रक्चर मालक-एस आर लाईट.
Web Summary : Kolhapur police booked 54 individuals, including heads of 18 groups, DJ owners, and structure providers, for excessive noise and illegal structures during Durga procession. Violations included noise pollution, obstructing roads, and endangering public safety, leading to strict action and potential career implications for many involved.
Web Summary : कोल्हापुर पुलिस ने दुर्गा विसर्जन जुलूस के दौरान अत्यधिक शोर और अवैध संरचनाओं के लिए 18 मंडलों के प्रमुखों, डीजे मालिकों और स्ट्रक्चर प्रदाताओं सहित 54 लोगों पर मामला दर्ज किया। उल्लंघन में ध्वनि प्रदूषण, सड़क अवरुद्ध करना और सार्वजनिक सुरक्षा को खतरे में डालना शामिल है, जिससे सख्त कार्रवाई हुई और कई लोगों के करियर पर असर पड़ने की संभावना है।