शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती दरम्यान महिलेल्या मृत्यू प्रकरणी  तब्बल १९ महिन्यांनी गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:50 IST

CrimeNews Police Kolhapur- प्रसूती दरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरासह तीघांवर वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल १९ महिन्यांनी निष्काळजीपने व हयगय केल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला.

ठळक मुद्दे प्रसूती दरम्यान महिलेल्या मृत्यू प्रकरणी  तब्बल १९ महिन्यांनी गुन्हा नोंददोन डॉक्टरासह तीघांवर वडगाव पोलिसात गुन्हा

पेठवडगाव: प्रसूती दरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरासह तीघांवर वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल १९ महिन्यांनीनिष्काळजीपने व हयगय केल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला.याबाबत स्त्री रोग तज्ज्ञ डॉ यशवंत केळुसकर, त्यांच्या पत्नी विद्या केळुसकर (दोघे रा.पेठवडगाव),भूल तज्ज्ञ डॉ अनिल शिंदे (रा.कोल्हापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद सुभाष शंकर पाटील(वय ४०,रा.कणेगांव,ता.वाळवा,जि.सांगली) यांनी दिली.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठवडगाव येथील एस टी स्टॅण्ड पाठीमागे केळुसकर हॉस्पीटल येथे स्त्री रोग व प्रसूती प्रसूती उपचार करण्यात येतात. येथे पाटील यांच्या पत्नी अश्वीनी यांच्या पहिल्या मुलीची ही प्रसूती केळुसकर हॉस्पीटल मध्ये करण्यात आली होती.नंतर दुसर्‍यादा प्रसूती पुर्व उपचारासाठी पाटील दांपत्य येत होते.

१२ मे २०१९ ला केळुस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन बी पी वाढला आहे.त्यामुळे सिझेरियन करावे लागेल असे सांगितले. तशी तयारी केली.मात्र पहिल्यांदाच भूल चढली नाही.म्हणून पुन्हा भूल देण्यात आली. यावेळी प्रसूती करण्यासाठी डॉ. यशवंत केळुसकर, भुलतज्ञ डॉ. अनिल शिंदे, सहाय्यक म्हणून विद्या केळुसकर ही उपस्थित होत्या.

उपचारादरम्यान गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानंतर सीपीआर रुग्णालयात त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याप्रकरणी तज्ञांचा अहवाल काही दिवसापुर्वी आल्या नंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस नाईक संदीप गायकवाड करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर