शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- अनधिकृत मदरसा कारवाईला अडथळा; गणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: February 3, 2024 16:58 IST

महापालिकेला घेराव, शासकीय कामात अडथळा प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे बुधवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून जमाव बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल, तसेच महापालिकेला घेराव घातल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी सुमारे सहाशेहून अधिक संशयितांवर गुन्हा दाखल केला. यात गणी आजरेकर यांचाही समावेश आहे. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल संशयितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.लक्षतीर्थ वसाहत येथील अलिफ अंजुमन मदरसा आणि सुन्नत जमातीचे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळी गेले होते. मात्र, गणी आजरेकर यांच्यासह परिसरातील महिला आणि मुस्लीम तरुणांनी कारवाईला विरोध करून मदरशासमोर ठिय्या मारला.

आजरेकर यांनी जमावाला चिथावणी देऊन महापालिकेला घेराव घालण्यास फूस लावली. काही तरुणांनी हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा करून रस्त्यांवरील वाहतुकीचा खोळंबा केला. 

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महापालिकेला घेराव घातला. यामुळे शहरात ठिकठिकाणी तणाव निर्माण होऊन धार्मिक द्वेष वाढल्यामुळे पोलिसांनी सुमारे ६०० जणांवर शनिवारी (दि. ३) गुन्हा दाखल केला. संशयितांवर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस