शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २० शाळांमध्ये कार्बनमुक्त कोल्हापूर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:17 IST

फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेमार्फत ‘कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५’ ही मोहीम राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुरू झाली आहे. पाण्याविषयीच्या पर्यावरण खेळातून सुरू झालेल्या या मोहिमेत कोल्हापुरातील ९ शाळांनी सहभाग घेतला असून, अजून ११ शाळा या आठवड्यात सहभागी होत आहेत.

ठळक मुद्देशहरातील २० शाळांमध्ये कार्बनमुक्त कोल्हापूर मोहीमफ्रायडेज फॉर फ्यूचर्सचा पुढाकार : पाण्याच्या पर्यावरण खेळात विद्यार्थी सहभागी

कोल्हापूर : फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेमार्फत ‘कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५’ ही मोहीम राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुरू झाली आहे. पाण्याविषयीच्या पर्यावरण खेळातून सुरू झालेल्या या मोहिमेत कोल्हापुरातील ९ शाळांनी सहभाग घेतला असून, अजून ११ शाळा या आठवड्यात सहभागी होत आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महाराष्ट्र हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमातून या मोहिमेस प्रारंभ केला.कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, विक्रम हायस्कूल, कसबा बावडा येथील भाई माधवराव बागल प्रशाला, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, उचगाव येथील न्यू माध्यमिक विद्यालय, नानासाहेब गद्रे हायस्कूल, राजर्षी शाहू विद्यालय आणि महाराष्ट्र हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्याविषयीचा पर्यावरण खेळ खेळत या मोहिमेत भाग घेतला. याशिवाय गेल्या आठवड्यात या खेळाचे प्रशिक्षण घेतलेल्या इतर ११ शाळा पुढील आठवड्यात या उपक्रमात सहभागी होत आहेत.काय आहे कार्बनमुक्त मोहीम...वायूप्रदूषणात कोल्हापूर शहर हे वरच्या क्रमांकावर असल्याने ते कार्बनमुक्त करणे ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. यासाठी सायकल प्रवास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करण्याने शहरातील कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे. कोल्हापुरात नजीकच्या काळात इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत.फ्रायडेज फॉर फ्युचर्सतर्फे पर्यावरण जागृतीस्वीडनमधील ग्रेटा थुनबर्ग हिच्या आंदोलनाने प्रभावित झालेल्या कोल्हापुरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेमार्फत विविध शाळा आणि महाविद्यालयांत पर्यावरण जनजागृती करण्यात येत आहे.

पर्यावरणाच्या कठीण संकल्पना मुलांमध्ये खेळांद्वारे अत्यंत सहज पण खूप परिणामकारकरित्या रुजविता येतात. मुले नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात. त्यामुळे त्यांच्याद्वारे प्रत्येक परिवाराद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे, कार्बन (फूटप्रिंट) पदचिन्ह कमी करणे शक्य आहे.नितीन डोईफोडे,पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर.

 

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर