शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: यड्राव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; महिला ठार, दहाजण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:16 IST

घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली

यड्राव :  यड्राव (ता. शिरोळ) येथे चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार झाली. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर तारदाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दहाजण जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना आज, सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील संगम नगर मधील सनदी परिवारातील हे सदस्य आहेत. रुग्णवाहिकेतून इचलकरंजी इथे आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.  तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक-निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ चारचाकी वाहनचालकाचा दुसºया वाहनाला चुकविताना वाहनावरील ताबा सुटला. यामुळे चारचाकी वाहन उलटून रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये जाऊन पडले. या भीषण अपघातामुळे मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार महिलांना मोठी दुखापत झाली आहे. तर यामध्ये पाच मुलेही जखमी झाली आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहापूर पोलिस तब्बल पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला. यावेळी मृतदेह व जखमींना पाहून नातेवाईकांसह अनेकांनी हंबरडा फोडला. सनदी कुटुंबीय हे पूर्वी रेणुकानगर यड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिक त्यांना ओळखत होते.  या घटनेमुळे उपस्थित नागरिकातून हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू