शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उदगाव पुलावरुन कार कोसळली; ‘एअरबॅग’ उघडली, अन् जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:50 IST

अपघातात चालकासह तिघेजण जखमी

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा ताबा सुटून पुलावरून खाली कोसळली. यामध्ये वाहनातील दोघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना रविवारी घडली.अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तात्काळ पोलिसांनी वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढले. अपघातानंतर सांगली कोल्हापूर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव येथील कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाणारा वाहन चालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक पाईपला धडकून खोल खड्डयात कोसळली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चालकासह तिघेजण जखमी झाले असून खिडकीचा काच फोडून नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून झालेला वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

एअरबॅगमुळे जीव वाचलावाहन चालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक पाईपला धडकून कार खोल खड्डयात कोसळली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. चालकासह तिघेजण जखमी झाले असून खिडकीचा काचा फोडून नागरिकांनी त्यांना बाहेर काढले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcarकारAccidentअपघात