शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कारला लागली आग, टाकीचा स्फोट; ७ जण बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:52 IST

आगीचे लोट बाहेर पडत असतानाही, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी धावत जाऊन गाडीचे दरवाजे ओढून काढले

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्यवळणावर रविवारी दुपारी एक थरारक घटना घडली. नृसिंहवाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या एका सातआसनी कारला अचानक आग लागली. आगीचे लोट आणि धुराचे लोट हवेत उसळत असतानाच, भाजप नेते सावकार मादनाईक आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात जण थोडक्यात बचावले. सर्वांना बाहेर काढल्यानंतर काही क्षणांतच कारच्या इंधन टाकीचा मोठा स्फोट झाला.पुणे येथील पाटील कुटुंबीय नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर कवठेपिरान येथील पाहुण्यांकडे निघाल्या होते. उदगाव येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या बाह्यवळणावर कार आली असता, अचानक इंजिनमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. याच वेळी गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने सर्वांच्या जिवावर बेतले होते.

त्याच वेळी शेताकडे जाणारे भाजप नेते सावकार मादनाईक आणि काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. गाडीतून आगीचे लोट बाहेर पडत असतानाही, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी धावत जाऊन गाडीचे दरवाजे ओढून काढले. चालक, तीन महिला आणि तीन लहान मुलांना तातडीने सुखरूप बाहेर काढले.सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर नेल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत कारच्या इंधन टाकीचा भीषण स्फोट झाला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. आगदेखील विझविण्यात आली, मात्र अवघ्या १५ मिनिटांत कार जळून खाक झाली होती.

माणुसकीचे दर्शनया अपघातामुळे पाटील कुटुंब पूर्णपणे हादरून गेले होते. त्यांची अवस्था पाहून मादनाईक यांनी तातडीने स्वतःची चारचाकी गाडी बोलावली आणि या कुटुंबाला कोल्हापूर येथील त्यांच्या घरी सुखरूप पाठवून दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Car Catches Fire, Tank Explodes; Seven Survive Miraculously

Web Summary : A car caught fire near Udgaon, Kolhapur. Prompt action by a local leader and citizens saved seven occupants moments before the fuel tank exploded. All passengers were safely transported home after the incident.