शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर फौजदाराला पाठलाग करून पकडले

By admin | Updated: October 3, 2015 23:52 IST

सांगलीत कारवाई : पैसे रस्त्यावर फेकून दिले

सांगली : चोरीच्या प्रकरणात जप्त केलेली मोटार देण्यासाठी न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी संशयित आरोपीकडूनच सात हजारांची लाच घेणाऱ्या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास थरारक पाठलाग करून पकडण्यात आले. मधुकर आबा शिद (वय ५६, रा. इंदुमती निवास, क्रांतिनगर, वानलेसवाडी, सांगली) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बदाम चौकात शनिवारी दुपारी दोन वाजता ही कारवाई केली. पथक मागावर असल्याचे समजताच त्याने बदाम चौकातच लाचेची रक्कम रस्त्यावर फेकून दिली, पण तरीही त्यास पकडून कारवाई यशस्वी केली. अंकली (ता. मिरज) येथे तीन महिन्यांपूर्वी शाळा फोडून चोरट्यांनी संगणक व मॉनिटर लंपास केले होते. सहायक फौजदार मधुकर शिद याच्याकडे या चोरीचा तपास होता. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लाऊन अंकलीतील संशयितास अटक केली होती. त्याच्याकडून चोरलेले संगणक, मॉनिटर जप्त केले होते. तसेच त्याच्या ताब्यात एक आलिशान मोटार सापडल्याने तीही जप्त केली होती. महिन्यापूर्वी हा संशयित जामिनावर बाहेर आला आहे. जप्त केलेली मोटार परत मिळावी, यासाठी त्याने शिदची भेट घेतली होती. शिदने त्याला ही मोटार न्यायालयाच्या आदेशाने द्यायला लागते. यासाठी न्यायालय आमचे म्हणणे मागवून घेतले. म्हणणे द्यायचे असेल, तर तुला दहा हजारांची लाच द्यावे लागेल, असे सांगितले. पैसे दिलास तरच न्यायालयात म्हणणे सादर करणार, असेही शिदने सांगितले होते. त्यामुळे संशयिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी तक्रारीची चौकशी सुरू केली. तक्रारदारास पंचांसोबत पुन्हा शिदची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने भेट घेऊन दहा हजार जास्त होतात, थोडे कमी करा, अशी विनंती केली. चर्चेअंती शिदने सात हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराने शनिवारी दुपारी लाचेची रक्कम घेऊन येतो, असे सांगितले. तक्रारदार पोलीस ठाण्याजवळ लाचेची रक्कम घेऊन गेला. त्याने शिदशी मोबाईलवर संपर्क साधला. शिद पोलीस ठाण्यातून दुचाकीवर बसून बाहेर आला. तक्रारदारासही त्याने दुचाकीवर बसवून पोलीस वसाहतीच्या कोपऱ्यावर नेले. तिथे त्याने लाचेची रक्कम स्वीकारुन शर्टाच्या खिशात ठेवली. त्यानंतर तक्रारदारास त्याने जाण्यास सांगितले. पथकाची ‘फिल्डिंग’ शिदने तक्रारदारास लाचेची रक्कम कुठे स्वीकारणार, याचा कानोसा लागून दिला नव्हता. त्यामुळे पथकालाही शिदविरुद्ध सापळा लावणे अवघड बनले होते. पण तरीही त्यांनी वेशांतर करून ग्रामीण पोलीस ठाण्यात, ठाण्याबाहेर, बदाम चौक, हिंदू-मुस्लिम चौकात सापळा लावला होता. शिदने पैसे घेऊन दुचाकीवरुन गेल्यानंतर उपअधीक्षक आफळे यांनी तक्रारदारास संपर्क साधून शिद कुठे गेला? अशी विचारणा केली. त्यावेळी तक्रारदाराने ‘साहेब तो पैसे घेऊन गेला’, असे सांगितले. त्यानंतर आफळे यांनी त्यांची कारवाई सुरु केली. शिदचा पाठलाग सुरु केला. तो बदाम चौकापर्यंत गेल्याचे समजताच पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन त्यास गाठले. या कर्मचाऱ्यांना पाहून शिदने लाचेची रक्कम रस्त्यावरच फेकून दिली. शर्ट, नोटा जप्त शिदने स्वत:चा बचाव करण्याचा फार प्रयत्न केला. पण पथकाने सर्व पुराव्यानिशी त्यास पकडण्यास ‘फिल्डिंग’ लावली होती, असे त्याला समजून आले नाही. लाचेच्या नोटांना पावडर लावण्यात आली होती. तसेच नोटांचे क्रमांक टिपून घेण्यात आले होते. रस्त्यावर टाकलेले पैसे पथकाने जप्त केले. तसेच नोटांची पावडर त्याच्या शर्टाच्या खिशाला लागली होती. त्यामुळे हा शर्टही जप्त केला आहे. शिदला रविवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. तो हजेरी मेजर म्हणूनही पोलीस ठाण्यात काम करीत होता.