शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तोफ उडाली अन‌् युवकाचा हात फाटला, दुसऱ्याचे डोळे निकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 20:12 IST

diwali, accident, police, kolhapurnews दीपावलीचा दिवसभर आनंदोत्सव झाला. शनिवारी (दि. १४) सायंकाळी श्री लक्ष्मीपूजनानंतर प्रथेप्रमाणे तोफ उडवली अन‌् अनर्थ घडला. तोफेतील दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. तोफ उडवणाऱ्या युवकाचा हात निकामी झाला; तर दुसऱ्याच्या डोळ्यांत शोभेची दारू गेल्याने त्यालाही रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले, तसेच तिसऱ्या युवकाच्या डोक्याला तोफेचा गोळा घासून गेल्याने तो थोडक्यात बचावला; पण त्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात घडल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देतोफ उडाली अन‌् युवकाचा हात फाटला, दुसऱ्याचे डोळे निकामे सिद्धाळा गार्डन परिसरातील घटना : दुर्घटनेत तिघे जखमी; दोघे रुग्णालयात

कोल्हापूर : दीपावलीचा दिवसभर आनंदोत्सव झाला. शनिवारी (दि. १४) सायंकाळी श्री लक्ष्मीपूजनानंतर प्रथेप्रमाणे तोफ उडवली अन‌् अनर्थ घडला. तोफेतील दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. तोफ उडवणाऱ्या युवकाचा हात निकामी झाला; तर दुसऱ्याच्या डोळ्यांत शोभेची दारू गेल्याने त्यालाही रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले, तसेच तिसऱ्या युवकाच्या डोक्याला तोफेचा गोळा घासून गेल्याने तो थोडक्यात बचावला; पण त्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात घडल्याची चर्चा सुरू आहे.दीपावलीच्या सणानिमित्त यंदा मोठे फटाके उडविण्यास शासनाने निर्बंध घातले. शनिवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर कोल्हापूर शहरात फटाक्यांची आतषबाजी झाली. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात तर चक्क लक्ष्मीपूजनानंतर एका घराण्यात दरवर्षी तोफ उडविली जाते. या घराण्याच्या वतीने पूर्वी शहरातून श्री तुळजाभवानी देवीची सबिना मिरवणूक काढली जात असे; पण काळाच्या ओघात मिरवणूक बंद झाली. त्यातील धातूची तोफ आजही या घराण्याकडे आहे.

शनिवारी श्री लक्ष्मीपूजनानंतर रात्री दहाच्या सुमारास तोफ उडविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भागातील तरुण जमले. त्याच वेळी तोफेचा पहिला बार उडविला. तोफ गरम असतानाच त्यात दुसऱ्यांदा शोभेची दारू ठासून भरत असतानाच अचानक या दारूचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज होऊन धूर पसरला. स्फोटामुळे तोफेत दारू ठेचणाऱ्या युवकाच्या हाताचा पंजा फाटून हातच निकामा झाला; तर बालाजी पार्क परिसरातील युवकाच्या डोळ्यात स्फोटाची दारू उडाल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तोफेचा गोळा तिसऱ्या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने तो मोठ्या दुर्घटनेतून बचावला.पोलिसांची फक्त पाहणीदरम्यान, रात्रीच जखमी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली; पण त्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी पाहणी केली; कोणाचीही तक्रार नसल्याने पोलीस प्राथमिक चौकशी करून निघून गेले. 

टॅग्स :AccidentअपघातDiwaliदिवाळीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसReligious programmeधार्मिक कार्यक्रम