शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
3
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
4
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
5
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
6
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
7
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
8
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
9
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
10
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
11
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
12
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
14
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
15
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
16
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
17
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
18
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
19
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
20
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: आले तोंडावर मतदान.. मतांसाठी महिलांना वाण; मकर संक्रांतीआधीच भेटवस्तू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:59 IST

चिन्हाच्या आकारात वाणला मागणी, एकही कारवाई नाही...

कोल्हापूर : तिळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाआधीच महापालिका क्षेत्रातील महिलांनी वाण लुटले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर १४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण असल्याने उमेदवारांना ही मोठी संधीच मिळाली आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आताच उमेदवारांकडून जागोजागी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू झाले असून, त्यात विविध भेटवस्तूंचे ‘वाण’ वाटले जात आहेत.कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. उमेदवार पायाली भिंगरी लावून फिरत आहेत. दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यात सणवार म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मकर संक्रांतीला हळदी कुंकू आणि एकवस्तू वाण म्हणून भेट दिली जाते. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सण आल्याने उमेदवारांनी तो कॅच न केला तर नवलच. त्यामुळे सणाआधीच भागाभागांमध्ये हळदी-कुंकू आणि वाण म्हणून भेटवस्तू दिली जात आहे. त्यामुळे सणाआधीच महिला मतदारांसाठी सण सुरू झाला आहे.

शहरात अडीच लाख महिला मतदारशहरात २ लाख ४९ हजार ९४० महिला, तर २ लाख ४४ हजार ७३४ पुरुष मतदार आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने महिलांना साद घालण्यासाठी हळदी-कुंकूसारखा दुसरा उपक्रम नाही. मतदान १५ ला, तर संक्रांत १४ तारखेला. १४ तारखेला उमेदवारांना जाहीर कार्यक्रम करता येणार नाही, त्यामुळे सणाआधीच महिलांकडे वाण पोहोच झाले आहे.

वाणसामान, भेटवस्तू देण्याचा फंडावाण म्हणून उमेदवारांचे चिन्ह असलेला हळदी-कुंकवाचा करंडा किंवा त्या आकारात तयार केलेली कोणतीही एक वस्तू दिली जात आहे. यासह स्टीलचा लहान डबा, प्लास्टिकचे डबे, बाऊल, वाट्या, दिवे, शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, इमिटेशन ज्वेलरी अशा अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या जात आहेत. यासोबत प्रचाराचे पत्रक, उमेदवाराचे चिन्ह वाटले जात आहे.

एकही कारवाई नाही...महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी एकाही उमेदवारावर कारवाई झालेली नाही. उमेदवाराकडून केला जाणारा कोणताही उपक्रम हा आचारसंहितेच्या चौकटीत बसवला जात आहे. हळदी-कुंकूसारखा कार्यक्रम, वाढदिवसानिमित्त जेवणावळी अशा कोणत्या ना कोणत्या पळवाटांमधून मतदारांवर अमाप पैसा खर्च केला जात आहे. पण, एवढ्या ढीगभर नेमलेल्या पथकांनी कारवाई केलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Gifts for women voters before Makar Sankranti festival.

Web Summary : Ahead of Kolhapur Municipal elections and Makar Sankranti, candidates are wooing women voters with 'Haldi-Kunku' ceremonies and gifts. With more women voters than men, candidates are distributing household items and promotional materials, exploiting loopholes in the code of conduct, while authorities remain inactive.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Makar Sankrantiमकर संक्रांतीWomenमहिला