कालव्याचे आवर्तन आता दहा दिवसांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:14+5:302021-03-24T04:22:14+5:30
काळम्मावाडी धरणाच्या पूर्व बाजूला उजवा कालवा तर उत्तरेकडे डावा कालवा वाहतो. हे कालवे अनेक गावांना वरदायिनी ठरले आहेत. पिण्याच्या ...

कालव्याचे आवर्तन आता दहा दिवसांनी
काळम्मावाडी धरणाच्या पूर्व बाजूला उजवा कालवा तर उत्तरेकडे डावा कालवा वाहतो. हे कालवे अनेक गावांना वरदायिनी ठरले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई असणाऱ्या गावात आता बागायती शेती झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी कालव्याच्या पाण्यावर विसंबून आहेत. गेल्या तीन महिन्यात उन्हाची तीव्रता कमी होती. त्यामुळे १५ ते २२ दिवसाच्या अंतराने या कालव्यात पाण्याची आवर्तने दिली जात होती. गतवर्षी निढोरी आणि बिद्री कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले. त्यामुळे पाण्याची बचत होऊन शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यात मदत होत आहे. दरम्यान,या पाण्याच्या नियोजनामुळे हजारो एकरातील पिकांना वरदान लाभले आहे.
चौकट- पाणी साठा निम्म्यावर! काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता २५ टीएमसी इतकी आहे. यामध्ये सध्या १२.३१ टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक आहे.
‘कालव्याच्या दोन्ही बाजूच्या जमिनी हलक्या प्रतीच्या आहेत. मार्च ते मे अखेर उन्हाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कालव्याच्या आवर्तनातील कालावधी कमी करणार आहोत. -
भाग्यश्री परब
सहायक अभियंता, दुधगंगा पाटबंधारे
कॅप्शन- निढोरी उजवा कालवा असा म्हाकवे परिसरातून असा ओसंडून वाहत आहे.
छाया-दत्तात्रय पाटील