कनाननगरात चारजण पॉझिटिव्ह, अन्य ४० जण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:54 IST2021-04-22T19:52:40+5:302021-04-22T19:54:15+5:30
CoronaVirus Kolhapur : संचारबंदी असतानाही कनाननगरात गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ४४ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर अन्य ४० जण निगेटिव्ह आले. या परिसरात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.

कनाननगरात चारजण पॉझिटिव्ह, अन्य ४० जण निगेटिव्ह
कोल्हापूर : संचारबंदी असतानाही कनाननगरात गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ४४ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर अन्य ४० जण निगेटिव्ह आले. या परिसरात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.
संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. कनाननगरातही विनाकारण फिरणाऱ्या ४४ नागरिकांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर चारजण पॉझिटिव्ह आले आहेत. त्या चारजणांना तात्काळ विलगीकरणात हालविण्यात आले. ते सर्वजण कनाननगर झोपडपट्टीतील आहेत.
यावेळी अचानकपणे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी या परिसराला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, माजी नगरसेवक दिलीप पोवार उपस्थित होते.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटीलनगरातही भाजी खरेदीस आलेल्या १४४ जणांची तपासणी मोबाईल व्हॅनदारे करण्यात आली. त्यातील १४० जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर दोन भाजी विक्रेते, दोन स्थानिक नागरिक पॉझिटिव्ह आले.