शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पाहुणे म्हणून आले, पाच हजारांचा दंड करून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 3:28 PM

शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, प्लास्टिकचा वापर केला म्हणून, सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सीला पाच हजार रुपये दंड केला. या कारवाईमुळे संयोजकदेखील हिरमुसले.

ठळक मुद्देपाहुणे म्हणून आले, पाच हजारांचा दंड करून गेलेआयुक्तांंच्या कारवाईने शिवाजी विद्यापीठात चर्चा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, प्लास्टिकचा वापर केला म्हणून, सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सीला पाच हजार रुपये दंड केला. या कारवाईमुळे संयोजकदेखील हिरमुसले.शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी (दि. ९) ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आयुक्त कलशेट्टी यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या सन्मानचिन्हास प्लास्टिकचे कव्हर असल्याचे आयुक्त यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे त्यांनी सदरचे सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या एजन्सीचा शोध घेण्याच्या सूचना विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांना दिल्या. त्यानुसार राजगोळकर यांनी प्रतिभानगर, पायमल वसाहत येथे जाऊन सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सीचा शोध घेतला. त्यांना प्लास्टिक कव्हर लावल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड केला.कोल्हापूर शहर ३१ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची आवश्यकता असून शहर स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त करावे, असे आवाहन कलशेट्टी यांनी कार्यक्रमात केले. 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूर