शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
2
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'अत्यंत दळभद्री...'; नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावरुन संतापले संजय राऊत
6
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
7
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
8
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
9
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
10
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
11
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
12
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
14
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
15
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
16
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
17
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
18
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
19
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
20
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

‘ट्राय’च्या बदललेल्या नियमामुळे केबलचालकांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 2:57 PM

‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी याकडे

ठळक मुद्देअद्यापही २० टक्के ग्राहकांची कनेक्शन बंद : देखभाल खर्च गेला हाताबाहेर

विनोद सावंत कोल्हापूर : ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया)ने पसंतीनुसार चॅनेल निवड करण्याचा नियम केला. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन नियमाचा सर्वाधिक फटका केबलचालकांना बसला असून, त्यांचे कंबरडे मोडले आहे. नियमानंतर दहा महिने होत आले तरी जिल्ह्यातील २० टक्के ग्राहकांनी केबल कनेक्शन घेतलेली नाहीत. पूर्वीपेक्षा फायदा कमी झाल्याने केबलचालकांना देखभाल खर्च करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली. पूर्वी सुमारे १५० ते २०० रुपयांत मिळणाऱ्या चॅनेलसाठी आता २५० ते ३०० रुपये खर्च करावा लागत असल्यामुळे अनेकांनी केबल कनेक्शन पुन्हा सुरू केलीच नाहीत, हे वास्तव आहे.

  • जिल्ह्यातील केबल ग्राहक - सुमारे ४ लाख 

शहरातील केबल ग्राहक - ८० हजार केबल आॅपरेटर - १३०० 

  • पसंतीनुसार चॅनेल निवडीच्या नियमाला दहा महिने होत आले तरी २० टक्के ग्राहकांनी केबल कनेक्शन सुरू केलेली नाहीत. जिल्ह्यात सुमारे ८० हजार ग्राहकांचा यामध्ये समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचा फटका केबलचालकांसह सिस्टीमचालकांनाही बसत आहे. 

- यशोराज पाटील, जनरल मॅनेजर, बी टीव्हीफायदा ३५ टक्के झाला कमीएका ग्राहकामागे यापूर्वी १४० रुपयांचा फायदा मिळत होता. नवीन नियमामुळे हा फायदा ९० रुपयांवर आला आहे. चॅनेलने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा पैसे घेता येत नाहीत. त्यामुळे ३५ टक्के फायदा कमी झाला आहे. याचा परिणाम देखभाल खर्चावर होत आहे. कामगार पगार, केबल वायर, अ‍ॅम्प्लिफायर खराब झाल्यास दुरुस्तीचा खर्च हे सर्व हाताबाहेर गेले आहे.- संतोष पाटील, जरगनगर-रामानंदनगर केबलचालक महापुराचाही फटकाग्रामीण भागातील ग्राहक शेतीतील कामे झाल्यानंतर जूनमध्ये कनेक्शन पुन्हा सुरू करतील, अशी अपेक्षा केबलचालकांना होती. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका जसा इतर व्यवसायांना बसला, तसा केबल व्यवसायाला बसला. महापुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे जूननंतरही केबल कनेक्शन घेण्यास अनेकांनी पाठ फिरविली.  

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा