रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत, ६ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:22 IST2018-03-20T17:22:58+5:302018-03-20T17:22:58+5:30
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सोमवार या शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत, ६ उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २६ मार्च हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. सेना, भाजप व कॉँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपतर्फे वसंत पाटील व कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सनीफ गवाणकर यांचे प्रत्येकी २ अर्ज व सेनेचे दोन अर्ज मिळून एकूण ६ अर्ज या पोटनिवडणुकीसाठी दाखल झाले आहे. २० मार्चला अर्जांची छाननी होणार असून, २६ मार्च ही माघारीची अंतिम तारीख आहे. २७ मार्चला चिन्हांचे वाटप होणार आहे. ६ एप्रिलला मतदान होणार असून, ७ एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
सोमवारी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना राजन शेट्ये यांच्यासोबत जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख तथा नगरपरिषदेतील सेनेचे गटनेते बंड्या साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, पाणी समिती सभापती बावा नागवेकर, सेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग ३ ब ही शिवसेनेचीच जागा आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच विजय होईल, असा दावा सेनेने केला.
सेना-भाजपमध्ये झुंज!
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग २ ब मध्ये शिवसेना उमेदवार राजन शेट्ये व भाजप उमेदवार वसंत पाटील यांच्यातच खरी झुंज होणार असल्याची चर्चा आहे.या प्रभागात सेना उमेदवार राजन शेट्ये यांनी आधी नगरसेवक असताना अनेक विकासकामे केली आहेत. मात्र भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची केली असून सेनेला धूळ चारण्यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत.