शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लॅन’ करून संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढविले: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 19:29 IST

परंतु एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांचा पूर्ण हिंदुत्वाचा पायाच उखडण्यात आला त्याचे काय, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर : ‘होय, मी शरद पवार यांचा माणूस आहे’ हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं ते बरं झालं. पूर्णपणे ‘प्लॅन’ करून संजय राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढविण्यात आलं; परंतु एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांचा पूर्ण हिंदुत्वाचा पायाच उखडण्यात आला त्याचे काय, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणा स्वतंत्र आहेत. त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने सुरू आहे. त्याआधीही सेना-भाजपचे सरकार पाडण्याचा तीन वेळा प्रयत्नही झाला; परंतु २०१९ च्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना यांच्यामध्ये अंतर कसे वाढेल याचा ‘प्लॅन’ करण्यात आला. राऊत यांनी तो राबवला.हिंदुत्वाचा पायाही ठरवून काढून घेण्यात आलाआमच्या दोघांच्याही जास्त जागा आल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी आपण स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे मला सांगितले. तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांना शंका आली. फडणवीस मला म्हणाले, त्यांची पत्रकार परिषद होऊ दे. मग आपण बोलू. त्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले आणि ‘प्लॅन’ वास्तवात आला; परंतु या सगळ्यांमध्ये त्यांचा हिंदुत्वाचा पायाही ठरवून काढून घेण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना