नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST2021-03-31T04:23:35+5:302021-03-31T04:23:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठनंतर जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्याला विरोध असून, स्वयंशिस्त व ...

Business should be allowed to follow the rules | नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठनंतर जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्याला विरोध असून, स्वयंशिस्त व नियम पाळून उद्योगधंदे सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.

निवेदनात, अनेक दिवसांनंतर बंद असलेले उद्योगधंदे आता कुठे सुरळीत सुरू असताना पुन्हा शासनाने नवे नियम लादले आहेत. त्याचे पोलिसांकडून काटेकोर पालन करण्यात येत आहे. शहरात यंत्रमाग कारखाने, प्रोसेसर्स, सायझिंग व संबंधित उद्योगात दोन-तीन शिफ्ट सुरू असते. त्या अनुषंगाने हॉटेल, खाद्यपदार्थांचे गाडे, किराणा, पानपट्टी व इतर व्यवसाय सुरू असतात. रात्री आठनंतर जमावबंदी केल्याने हे सर्व घटक पुन्हा बंद होणार आहेत. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात पै. अमृत भोसले, प्रमोद बचाटे, प्रदीप मळगे, रवी गोंदकर, रामदास कोळी, निर्मल कांबळे, आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

३००३२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत स्वयंशिस्त व नियम पाळून उद्योगधंदे सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Business should be allowed to follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.