आंबोली धबधब्याजवळ बसचे ब्रेक फेल
By Admin | Updated: July 2, 2017 18:42 IST2017-07-02T18:42:34+5:302017-07-02T18:42:34+5:30
सहा वाहनांना उडविले : वाहतुकीची कोंडी, जीवितहानी नाही

आंबोली धबधब्याजवळ बसचे ब्रेक फेल
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली धबधब्याजवळच अचानक एका खासगी बसचे ब्रेक फेल झाल्याने या परिसरात एकच हलकल्लोळ उडाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे सात ते आठ वाहनांना या बसने जोरदार धडक दिली.
कोकणात सुरु असलेल्या प्रचंड पावसामुळे आंबोली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यातच रविवार असल्यामुळे कोल्हापूर, गोवा, बेळगाव परिसरातील पर्यटकांनी या परिसरात गर्दी केली होती. सायंकाळच्या दरम्यान आंबोलीहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्सवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्यामुळे धबधब्याजवळच सात ते आठ खासगी वाहनांना त्याने धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आंबोलीत एकच हलकल्लोळ उडाला.
या प्रकारामुळे या छोट्याशा परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहन हटविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अर्थात या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.