कोल्हापुरात राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST2021-08-25T04:29:09+5:302021-08-25T04:29:09+5:30

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा मंगळवारी येथील शिवाजी ...

Burning of a symbolic statue of Rane in Kolhapur | कोल्हापुरात राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

कोल्हापुरात राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा मंगळवारी येथील शिवाजी चौकात शहर शिवसेनेतर्फे दहन करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणेंविरोधात जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. कोल्हापूरसह सातारा, सांगली जिल्ह्यांतही राणेंच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

कोल्हापुरातील शिवाजी चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. मंत्री राणे यांची मंंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा गंभीर परिणाम होतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज तुम्ही येथे आहात, याचे भान ठेवा. राणे यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी अनेक पक्ष बदलले, उद्या भाजपही त्यांना बाजूला करेल, असे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले. कऱ्हाड येथील शिवसैनिकांच्या वतीने राणेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सांगलीत नारायण राणेंच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. यावेळी शिवसेना व पोलिसांत झटापट झाली. भाजपनेही यावेळी निदर्शन केली.

Web Title: Burning of a symbolic statue of Rane in Kolhapur