गडहिंग्लजमध्ये दानवेंच्या प्रतिमेचे दहन, शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:03 IST2020-12-12T21:02:16+5:302020-12-12T21:03:58+5:30
raosaheb danve, Shivsena, Kolhapurnews केंद्राने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे आणि पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे दहन केले.

गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारले.प्रा. सुनिल शिंत्रे, रियाज शमनजी, दिलीप माने उपस्थित होते.
गडहिंग्लज : केंद्राने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे आणि पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे दहन केले.
प्रारंभी प्रांत कचेरी ते दसरा चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली.दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.त्यानंतर प्रतिमेचे दहन करण्यात आले.
आंदोलनात चंदगड विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, रियाज शमनजी, गडहिंग्लज शहराध्यक्ष दिलीप माने, अवधूत पाटील, प्रतिक क्षीरसागर, सुरेश हेब्बाळे, अशोक खोत, काशिनाथ गडकरी, मंगल जाधव,रोहिणी भंडारे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.