शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पर्यटकांना खुणावतोय बर्कीचा धबधबा --पांढरेशुभ्र धबधबे, निसर्गरम्य परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:47 PM

पावसाळा सुरू झाला की, निसर्गप्रेमींना ओढ लागते ती वर्षा सहलीची व निसर्गस्थळांना भेट देण्याची.

ठळक मुद्देवर्षा पर्यटन : , हुल्लडबाजी रोखण्याची गरजबर्कीला कसे याल सांगली, कोल्हापूरहून - कळे- भोगाव-करंजफेण-बर्की सातारा-कोकरूड-मलकापूर - येळवणजुगाई-मांजरे-बर्की

अणुस्कुरा : पावसाळा सुरू झाला की, निसर्गप्रेमींना ओढ लागते ती वर्षा सहलीची व निसर्गस्थळांना भेट देण्याची. अशीच पर्यटकांची पावलं सरसावली आहेत ती शाहूवाडी तालुक्यातील बर्की येथील सुमारे अडीचशे फूट उंचीवरून कोसळणारा बर्की येथील नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी..!

कोल्हापूरहून कळे -बाजारभोगाव - करंजफेण मार्गे सुमारे ६५ किलोमीटरचा वळणावळणाचा प्रवास केल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य बर्की गावात आपण पोहोचतो. येथील निसर्ग सौंदर्य साठवायला नजर कमी पडते. वाऱ्याच्या संगीतावर डोलणारं माळरान, कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, मनाला अगदी वेड लावून टाकतात. कोसळणारा मेघराजा, हिरवीगार शाल पांघरलेल्या डोंगर रांगा, बर्की जलाशयाचे निळेशार पाणी आणि या पाण्यातून बोटिंगचा थ्रिलिंग वाटणारा जलप्रवास जणू आपल्याला प्रति महाबळेश्वरचाच अनुभव देतो.

दगडी पायवाट, हिरवीगार झाडी ओलांडून जाताना एक मस्त नेचर ट्रेकही आपणास अनुभवता येतो. त्यानंतर आपणास दिसतो तो सुमारे अडीचशे फूट उंचीवरून कोसळणारा पांढराशुभ्र फेसाळलेला धबधबा! पावसात कोसळणाºया धबधब्याखाली भिजण्याचा स्वर्गीय आनंद पर्यटकांना वेड लावून टाकतो. तिथल्या सौंदर्याने ओथंबलेल्या निसर्गाचे वर्णन करावयास शब्दही अपुरे पडतात. हिरवेगार डोंगर पाहताना निसर्गाने ओढलेली जणू हिरवीगार चादरच आपणास भासते. त्या सौंदर्यात भर म्हणून वनविभागाने केलेली दगडी पायवाट, पक्षीनिरीक्षक मनोरे, सुंदर पॅगोडे हे पर्यटकांना खास आकर्षित करत आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर खास बर्की ग्रामस्थांनी बनवलेल्या चुलीवरच्या नाचण्याच्या भाकरी, ओल्या मिरचीचा ठेचा, आदी जेवणाचा आस्वाद येथे घेता येतो.

 

पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद जरूर घ्यावा; परंतु कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये व तरुणाईच्या बेशिस्त वर्तनामुळे निसर्ग सौंदर्याला गालबोट लागेल असे वर्तन कोणीही करू नये त्यासाठी शाहूवाडी पोलिसांना विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे.- आनंद पाटील,अध्यक्ष बर्की, ग्रामदान मंडळ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर