जीवबा नाना जाधव पार्कमध्ये पावणेपाच लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:31+5:302021-02-08T04:22:31+5:30
कोल्हापूर : येथील पुईखडीनजीकच्या जीवबा नाना जाधव पार्कमध्ये चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे ४ लाख ८० हजारांची ...

जीवबा नाना जाधव पार्कमध्ये पावणेपाच लाखांची घरफोडी
कोल्हापूर : येथील पुईखडीनजीकच्या जीवबा नाना जाधव पार्कमध्ये चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे ४ लाख ८० हजारांची धाडसी घरफोडी केली. यावेळी चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड लांबवली. ही चोरीची घटना दिनांक ३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान घडली. याबाबत अभिजीत भालचंद्र लोकापुरे (रा. जीवबा नाना जाधव पार्क, पुईखडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिजीत लोकापुरे हे आपल्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यादरम्यान अज्ञाताने त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटले तसेच आतील लोखंडी दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील तिजोरीतील ड्राॅव्हरमधील ८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोल कडे, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, रोख पाच हजार रुपये व जिन्याखालील इनव्हर्टरची बॅटरी असा सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.