शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-पोलिसांचा अजब कारभार; गुन्हा दाखल घरफोडीचा; तपास केला दुचाकी चोरीचा

By उद्धव गोडसे | Updated: July 5, 2023 11:44 IST

चोरटे सापडत नसल्याचे सूचना पत्र फिर्यादींना पाठवले

उद्धव गोडसेकोल्हापूर : राजारामपुरीतील मंडलिक पार्क येथील घरफोडीचा गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन महिने उलटत आले तरी राजारामपुरी पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत. १४ लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी मात्र दुचाकी चोरीचा तपास केला. चोरटे मिळाल्यास किंवा गुन्ह्याचा तपास पुढे चालू केल्यास कळवू, असे पत्र पोलिसांनी फिर्यादींना पाठवले आहे. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे पुष्कराज प्रदीप सोनार (वय ३७, रा. मंडलिक पार्क, राजारामपुरी, १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांच्या घरात ९ एप्रिलच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी झाल्यानंतर सोनार यांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरटे लवकरच सापडतील, असे फिर्यादी सोनार यांना वाटत होते. मात्र, काही दिवसातच घरफोडीचा तपास पोलिसांच्या फाईलमध्येच राहिला.सोनार यांनी पोलिस ठाण्यात वारंवार हेलपाटे मारून पाठपुरावा केला. पण, 'तपास सुरू आहे. नंतर या.' एवढेच उत्तर त्यांना मिळाले. गेल्याच आठवड्यात त्यांना पोस्टाने राजारामपुरी पोलिसांचे सूचना पत्र मिळाले. त्यात म्हंटले आहे की, 'आपली चोरीस गेलेली मोटारसायकल व चोरी करणाऱ्या चोरट्यांचा आजअखेर शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, कारचा अगर चोरट्यांचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून आल्यास व पुढे गुन्ह्याचा तपास चालू केलेस आपणास कळवले जाईल.' याचा अर्थ पोलिसांनी तपास थांबवला असाच होतो. त्यामुळे १४ लाखांच्या दागिन्यांची चोरी झालेले सोनार कुटुंब हवालदिल झाले आहे.न घडलेल्या गुन्ह्याचा तपासपोलिसांच्या सूचना पत्रानुसार त्यांनी दुचाकी आणि कार चोरीचा तपास केला. परंतु, सोनार यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली असताना, पोलिसांनी त्यांना दुचाकी आणि कार चोरीच्या तपासाचे पत्र पाठवल्याने यातून पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.पोलिसांची सारवासारवयाबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, 'कर्मचाऱ्यांनी नजरचुकीने फिर्यादींना पत्र पाठवले असावे. या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्नाटकात निपाणीपर्यंत पथक गेले होते. लवकरच चोरट्यांचा शोध लागेल,' असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस