शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 19:04 IST

Kolhapur Flood : महापुराच्या स्थितीत कोल्हापूर शहराशी संपर्क कायम राहण्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल राज्य शासनाकडून बांधण्यात यावा. कुंभी-कासारी नदीचे पाणी हे कुशिरे, पोहाळेकडे नेण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी आंबेवाडी, वडणगे, प्रयाग चिखलीतील पूरग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

ठळक मुद्देआंबेवाडी, वडणगे, प्रयाग चिखलीतील ग्रामस्थांची मागणी मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 कोल्हापूर : महापुराच्या स्थितीत कोल्हापूर शहराशी संपर्क कायम राहण्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल राज्य शासनाकडून बांधण्यात यावा. कुंभी-कासारी नदीचे पाणी हे कुशिरे, पोहाळेकडे नेण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी आंबेवाडी, वडणगे, प्रयाग चिखलीतील पूरग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुपारी साडेबाराच्यासुमारास शिवाजीपूल येथून पूरबाधित परिसराची पाहणी केली. ह्यएनडीआरएफह्ण पथकाचे काम, पूरबाधित परिसराची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली. यावर्षीच्या मुसळधार पावसाने पूररेषा ओलांडली. महापुराचा आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे या गावांना फटका बसला.

महापुराची स्थिती उदभवल्यास कोल्हापूर शहराशी असलेला संपर्क कायम राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा अथवा रेडेडोह, केर्ली आदी तीन ते चार ठिकाणी कमानीसारखे उड्डाणपूल शासनाने बांधावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असल्याचे ह्यगोकुळह्णचे संचालक अजित नरके यांनी सांगितले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञांसमवेत चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य कोमल मिसाळ, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वसनासाठी रजपूतवाडी येथे दिलेल्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी प्रयाग चिखलीतील ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूर