शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला'; शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 10:04 IST

Sharad Pawar : काल विधिमंडळात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला.या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

Sharad Pawar ( Marathi News ) : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, दरम्यान, काल शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, खासदार शरद पवार यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. 

खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर आणि आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य केले. 

आधी पंकजा मुंडेंच्या विरोधातील ऑडिओ क्लिप व्हायरल, आज शिंदेंच्या जिल्हा प्रमुखांना मारहाणीच्या गुन्ह्यात अटक

अर्थसंकल्पावर बोलताना शरद पवार म्हणाले, 'साधी गोष्ट आहे मी एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च करणार म्हणालो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार?, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. 'पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतुद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हटलं तरी फारसा काही अर्थ लागत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

पीएम मोदींवर टीका 

"लोकसभेला महाराष्ट्रात आम्हाला ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या, ४८ पैकी ३१ जागा मिळतात याचा अर्थ लोकांचा ट्रेंड समजत आहे. या धसक्यामुळेच आता हे असं बजेट मांडले आहे, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडा आहे", अशी टीकाही शरद पवार यांनी केली. 'लोकांची मानसिकता स्पष्ट झाली आहे, लोक मोदींच्या कारभारावर खूष नाहीत. मोदी गॅरंटी सांगत होते पण, गॅरंटी चाललेली दिसत नाही. आता मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा