शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: यळगूडमध्ये एकाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:41 IST

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना पेट्रोलपंपासमोरील टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लाई (वय ५०, सध्या रा. ...

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना पेट्रोलपंपासमोरील टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लाई (वय ५०, सध्या रा. विशालनगर, हुपरी) यांचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री त्याच्या दुकानातच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोटात चाकूचे वार करून व डोक्यात लोखंडी टॉमीने वर्मी घाव घालून खून करण्यात आला आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांच्यासह पोलिस अधिकारी हे घटनास्थळांवरील माहिती घेऊन हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.याबाबत पोलिस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गिरीष पिल्लाई यांचे पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा येथे व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करून ते दुकानातच झोपले होते. त्यांच्या केरळमधील मूळ गावी वास्तव्यास असणारी त्यांची पत्नी रात्री साडेदहा वाजल्यापासून त्यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. दहा-पंधरा वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करून देखील संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिला काळजी वाटल्याने त्यांचा मित्र व कारखान्याचा कर्मचारी बबलू चव्हाण याला भ्रमणध्वनी करून गिरीष फोन का घेत नाही? याबाबत दुकानाकडे जाऊन चौकशी करण्यास सांगितले. बबलूने दुकानात जाऊन पाहिले असता दुकानाचे शटर बंद होते. शटर वर करून पाहिले असता गिरीष हा शटर जवळच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याने ही माहिती हुपरी पोलिसांना दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस