शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत युवकास अमानुष मारहाण, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:02 IST

पाळीव डुकराला मारण्याच्या कारणावरून केली मारहाण

इचलकरंजी : चारजणांनी एका युवकाचे पाय आणि हात पकडले आणि अर्धनग्न अवस्थेत असलेला एक रेकॉर्डवरील तरुण त्या युवकास काठीने पायाच्या तळव्यावर आणि नंतर मांडीवर अमानुषपणे मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. व्हिडीओ बघताना नागरिक संताप व्यक्त करत होते. या व्हिडीओवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.पाळीव डुकराला मारण्याच्या कारणावरून एका तरुणाने एका युवकास बोलावून घेतले. त्याला त्या डुकरासंदर्भात जाब विचारला. त्याने त्याची समर्पक उत्तरे न दिल्याने त्या तरुणाने आणखी चार युवकांना बोलावून घेतले. त्या युवकाचे हात आणि पाय पकडण्यास सांगितले. मानेवर पाय ठेवला. त्यानंतर प्रथम लोखंडी पाइपच्या साहाय्याने त्या तरुणाने युवकाच्या पायाच्या तळव्यावर बेदम मारहाण केली. त्यावेळी तो युवक मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करत, किंचाळत होता. त्यानंतर पुन्हा त्याने दोन युवकांना पाय आणि दोन युवकांना हात धरावयास लावले. हातात लोखंडी पाइप घेऊन फक्त चड्डी परिधान केलेल्या अर्धनग्न तरुणाने त्या युवकाच्या मांडीवर पुन्हा अमानुष मारहाण केली. मार खात असलेला युवक आपल्याला सोडण्यासाठी गयावया करत होता, परंतु याची कोणती तमा न बाळगता त्याने मारहाण सुरूच ठेवली. त्या तरुणाने मारहाण करतानाचा व्हिडीओ दोघांना चित्रित करण्यास सांगितले आणि तो व्हिडीओ स्वतःच व्हायरल केला. पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावरून संपूर्ण शहरभर पसरला. त्या व्हिडीओची दिवसभर चर्चा सुरू होती. मारहाण करणाऱ्या तरुणाला आणि मार खाल्लेल्या युवकास शहापूर पोलिसांनी बोलावून घेतल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस