शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ब्राऊन शुगर उत्पादनाची गरज

By admin | Updated: May 28, 2015 01:12 IST

संजीब पटजोशी : साखर परिषदेस प्रारंभ, साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : साखर उद्योगाला चांगले दिवस येण्यासाठी सर्वच साखर कारखान्यांनी ब्राऊन शुगर उत्पादित करणे ही काळाची गरज आहे, असे मत वैकुंंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंटचे संचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक संजीब पटजोशी यांनी बुधवारी व्यक्त केले. येथील राजाराम महाविद्यालयाच्या सभागृहात भारतीय शुगर यांच्यातर्फे दोन दिवस आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांची प्रमुख उपस्थिती होती.पटजोशी म्हणाले, इंधनाची मोठी मागणी आहे; त्यामुळे कारखानदारांनी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे. ब्राऊन शुगर तयार करावी. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना अतिशय चांगल्या आहेत. हे दोन्ही विमे साखर उद्योगातील अधिकाधिक कामगारांनी उतरावेत, यासाठी कारखानदारांनी पुढाकार घ्यावा. निराणी म्हणाले, देशात मोठा समजला जाणारा साखर उद्योग अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांसाठी साखरेचा दर कमी आणि उपपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना लागणाऱ्या साखरेला भाव अधिक, अशी व्यवस्था तयार केल्यास ऊस उत्पादकांचा चांगला दर देणे शक्य आहे. साखर कारखानदार अमित कोरे, पुणे येथील इंडियाना सुक्रोटेकचे प्रमोदकुमार बेलसरे, एम. एस. सुंदरम यांचे भाषण झाले. मुरगेश निराणी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संग्रामसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, अविनाश मुधोळकर, डॉ. जे. आर. पाटील, आदी उपस्थित होते.