शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

Kolhapur: कुटुंबाला मारहाण करणाऱ्या भावाचा सुपारी देऊन काढला काटा, निमशिरगावच्या खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:25 IST

सहाजणांना अटक

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील (वय ३५, रा. निमशिरगाव) याच्या खुनाचा उलगडा झाला आहे. सहा लाखांची सुपारी देऊन सख्ख्या भावानेच लहान भावाचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील (वय ३७, रा. निमशिरगाव), मोहन प्रकाश पाटील (वय ३३, रा. निमशिरगाव), राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (वय २३, रा. कुंभोज रोड, दानोळी), किरण आमाण्णा थोरात (वय २७, रा. धनगरवाडा दानोळी), सागर भीमराव लोहार (वय ३०) व अमर रामदास वडर (वय ३३, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले) या सहाजणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिसकोठडी सुनावली आहे.

मंगळवारी (दि. २७) सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तमदलगे गावच्या हद्दीतील डोंगरावर अविनाश पाटील याचा मृतदेह दिसून आला होता. मृतदेहालगतच मोटारसायकलही उभी होती. तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासयंत्रणा गतिमान केली होती. मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.अविनाश हा दररोज मद्य प्राशन भांडण करून त्याच्या मुलांना, पत्नीला मारहाण करीत होता. त्याच्या या कृत्याला कंटाळून भाऊ जिनगोंडा पाटील याने त्याचा मित्र मोहन पाटील याला भावाचा काटा काढायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर मोहन पाटील याने राकेश थोरात यास बोलावून घेतल्यानंतर त्याचा काटा काढण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. ठार मारण्यापूर्वी तीन लाख रुपये व मारल्यानंतर तीन लाख देण्याचे ठरले.अविनाश हा घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे जातो, यावर पाळत ठेवण्यास संशयितांनी सुरुवात केली होती. सोमवारी (दि. २६) रात्री अविनाशला तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जनस्थळी आरोपींना नेले. त्याठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी तपासयंत्रणा राबवून आरोपींना अटक केली...अन्य कारणांचा शोधअविनाश हा मद्यप्राशन करून पत्नी व मुलांना मारहाण करीत असल्याच्या कारणावरून भाऊ जिनगोंडा याने त्याच्या खुनाची सुपारी दिली होती. सहा लाख रुपयांना हा व्यवहार ठरला होता. पोलिस तपासात प्रथमदर्शनी हे कारण पुढे आले असले तरी आणखी कारणांचाही पोलिस शोध घेत आहेत.दगडाने ठेचून खूनआरोपींनी अविनाशच्या खुनाची सुपारी घेतल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून सोमवारी रात्री तमदलगे येथील डोंगरावर निर्जनस्थळी त्याला नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्या डोक्यात दगड घालून संशयितांनी त्याचा खून केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस