शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बहिणीला परीक्षेला सोडून घरी परताना काळाचा घाला, अपघातात भाऊ ठार; संकेश्वरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:16 IST

संकेश्वर : बहिणीला परीक्षेसाठी कॉलेजमध्ये सोडून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भावाला टँकरने जोराची धडक दिल्याने दुचाकीचालक आदर्शकुमार संजय गुप्ता (वय ...

संकेश्वर : बहिणीला परीक्षेसाठी कॉलेजमध्ये सोडून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भावाला टँकरने जोराची धडक दिल्याने दुचाकीचालक आदर्शकुमार संजय गुप्ता (वय १६, रा. हाैसिंग कॉलनी, संकेश्वर) या तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील जुना पी. बी. रोड पोस्ट ऑफिसनजीक सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसातून मिळालेली अधिक माहिती, आदर्शकुमार हा यामाहा स्कूटी (केए - २३, ईक्यू ०४१३) वरून बहीण निशा गुप्ता हिला परीक्षेसाठी कॉलेजला सोडण्यासाठी गेला होता. तिला सोडून पुन्हा घरी परत येत होता.दरम्यान, बसस्टॅंडकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर टँकर (केए २८, टीडी ३८९७) ला आदर्शकुमार ओव्हरटेक करत होता. यावेळी त्याची दुचाकी रस्त्याकडेच्या दुभाजकाला धडकून दुचाकीचालक ट्रॅक्टर टॅंकरच्या चाकात पडल्याने आदर्शकुमारच्या डोक्यास गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.वर्दळीच्या मार्गावर अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली असून, वडील संजय गुप्ता (रा. संकेश्वर) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक अक्षय करोशी (रा. नेर्ली) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. आदर्शकुमार हा एस. एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू