शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Kolhapur Crime: ..अन् भावजयीनेच काढला दिराचा काटा; जोतिबा डोंगरावरील खुनाचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:50 IST

दारू पाजली, हात-पाय बांधले अन् गळा आवळून केला खून

कोडोली : जोतिबा डोंगरावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवत खून प्रकरणाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. अनैतिक संबंधातून भावजयीने प्रियकराच्या मदतीने दीराचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव आप्पासो शंकर बोरगावे (वय ४५, रा. मोळे, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे नाव आहे.याप्रकरणी मुख्य संशयित गौडप्पा आनंद शिंदे (वय ३३, रा. कात्राळ, ता. कागवाड) व गाडी मालक राजू भिमाप्पा हुलागटी (रा. देसाईवाडी, ता. अथणी, जि. बेळगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

१२० ते १३० सीसीटीव्ही फुटेज तपासलेपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जोतिबा डोंगरावर शनिवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली होती. मृत व्यक्ती जवळ कोणताही ठोस पुरावा नसतानाही या खुनाचा छडा लावणे पोलिसांच्या समोर आव्हान होते. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ३ पथके करत जिल्ह्यातील १२० ते १३० सीसीटीव्ही फुटेज तपासले.

गाडी मालकाने खुनाची कबुली देत सर्व हकीकत सांगितलीगुन्ह्यातील मृतदेह चारचाकी गाडीतून जोतिबा डोंगरावर आणलेचे निष्पन्न केले. गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेत असताना, पथकास जयसिंगपूर येथे या गाडीचा नंबर दिसून आला. ही गाडी अथणी येथील राजू हुलागटी यांची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथक तत्काळ अथणी येथे दाखल झाले. पथकाने गाडी मालक राजू हुलागटी यास ताब्यात घेऊन सखोल माहिती घेतली असता, त्याने खुनाची कबुली देत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.

मारहाण अन् शिवीगाळ करीत असल्याचा मनात राग मृत आप्पासो बोरगावे याच्या भावाचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले होते. भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या पत्नीशी आप्पासो याचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे व आप्पा याच्या भावजचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. भावजचे इतर पुरुषाशी प्रेम संबध झाल्याच्या कारणावरून आप्पासो हा भावजय मारहाण करून शिवीगाळ करीत होता. याचा राग मनात धरून भावजयने गौडप्पा शिंदे यास फोन करून आप्पा यास संपवावे, असे सांगितले. दारू पाजली, हात-पाय बांधले अन् गळा आवळून खूनआरोपी गौडाप्पा शिंदे याने गाडी मालक याच्याशी संगनमत करून १८ एप्रिल रोजी उगार कर्नाटक येथील हॉटेलवर मृत आप्पा यास दारू पाजली. त्यानंतर आप्पास चारचाकी गाडीतून दि. १९ एप्रिल रोजी पहाटे २.०० वाजताच्या सुमारास जोतिबा ते गिरोली जाणारे रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर हात-पाय बांधून आणले. तसेच, त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस