संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:13+5:302021-07-05T04:16:13+5:30

जयसिंगपूर : उस्ताद रहिमत खाँ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ऑनलाईन निबंध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सिद्धेश्वर दुधनी, वसीम ...

Brief News Jaisingpur | संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

जयसिंगपूर : उस्ताद रहिमत खाँ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ऑनलाईन निबंध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सिद्धेश्वर दुधनी, वसीम अपराध व माणिक नागावे यांनी यश मिळविले. या स्पर्धेत सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरीसह परिसरातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्रे देण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन महमदशफी पैलवान यांनी केले होते.

----------------------------

पी.वाय. कुंभार यांची सामाजिक बांधीलकी

शिरोळ : येथील पी. वाय. कुंभार यांनी आपल्या नातीचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा केला. कोविड केअर सेंटरमध्ये वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, पी. वाय. कुंभार, अमोल कुंभार, प्रमोद कुंभार, दगडू माने, विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

-

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत शिरोळ : सध्या खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाने जोरदार आगमन केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: Brief News Jaisingpur