संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:02+5:302020-12-05T04:59:02+5:30
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयात अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग सिद्धार्थ कोरवी याला व्हीलचेअर ...

संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयात अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग सिद्धार्थ कोरवी याला व्हीलचेअर देण्यात आली. जितेंद्र हंकारे व महावीर मगदूम यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, शुभम बंडगर, अमोल माने, सुरेश माने, अशोक सुतार, बाळू मगदूम यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
---------------
अर्जुनवाडमध्ये रस्ता दुरुस्त करा
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या महिलांच्या सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर मुरुम टाकून रस्ता चांगला करावा. तसेच या ठिकाणी विद्युत दिव्यांची सोय करणे गरजेचे आहे. या मार्गावरील लवकरात लवकर स्वच्छता करावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
------------------
अर्जुनवाडमध्ये पर्यावरणप्रेमींतून संताप
अर्जुनवाड : अर्जुनवाड कृष्णा नदीपूल ते शिरोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडे या मार्गावर होणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव तोडण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. तोडलेल्या ठिकाणी नवीन झाडे लावावीत, अशी मागणी होत आहे.
------------------
दत्तवाडमध्ये गटर्सचे काम सुरू
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे गटर्स बांधकामाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. रेणुका मंदिर, दत्त मंदिर यांसह विविध ठिकाणी गटर्स खराब झाल्या होत्या. त्यामुळे या गटर्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर गटर्स बांधकामाचे काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
------------------
शेतकरी आंदोलनास पाठिंबा
जयसिंगपूर : शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीच्यावतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे निवेदन जयसिंगपूर पोलीस ठाण्यास देण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावे, कोरोना काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवेदनावर दिगंबर सकट, रूपाली धुमाळ, अफरीन तहसीलदार, नुसरत मुजावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.