संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST2021-05-27T04:24:39+5:302021-05-27T04:24:39+5:30

इचलकरंजी : ताराराणी पक्षाच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे यांनी ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : ताराराणी पक्षाच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे यांनी खंजिरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते. यावेळी विलास गाताडे, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, एम. के. कांबळे, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक साहित्याची मदत

इचलकरंजी : शिरदवाड (ता. शिरोळ) येथील कै. जे. एस. पाटील चॅरिटेबल ट्रस्टने प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना प्रतिबंधक साहित्याची मदत केली. ट्रस्टच्या अध्यक्षा संध्याराणी पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत माने यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले. यावेळी सरपंच मुक्ता बरगाले, उपसरपंच प्रकाश टोणपे, राकेश जाधव, आशुतोष पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Brief news