संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:02+5:302021-05-12T04:24:02+5:30
इचलकरंजी : भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाने महावीर जयंतीपासून नियोजनाची सांगड घालून मोफत अन्नछत्र सुविधा केंद्र सुरू केले आहे. ...

संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी : भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाने महावीर जयंतीपासून नियोजनाची सांगड घालून मोफत अन्नछत्र सुविधा केंद्र सुरू केले आहे. या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत असून, निराधार व होम क्वारंटाईन झालेले रुग्ण व नातेवाईकांना दोन्हीवेळी घरपोच जेवण देण्यात येत आहे. या उपक्रमास श्री आदिनाथ बॅँक कर्मचारी संघाने केंद्राला अकरा हजार रुपयांची मदत दिली आहे.
शेणी संकलन उपक्रम
इचलकरंजी : कोरोना रुग्णांबरोबरच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील स्मशानभूमीमध्ये शेणीची कमतरता भासत असल्याने येथील भाजपा युवा मोर्चाने प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या सूचननेुसार शेणी संकलनाचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. तरी ज्या व्यक्तींना शेणी किंवा इतर काही मदत करायची असल्यास त्यांनी शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, अरविंद चौगुले व रवींद्र घोरपडे यांच्याशी संपर्क साधावा.
इंगळी ग्रामपंचायतीकडून जनजागृती
इंगळी : येथील ग्रामपंचायतीकडून हायटेक यंत्रणेचा वापर करून जनजागृती केली जात आहे. ग्रामस्थांना कोरोना काळात नियमांचे व प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी ग्रामसुरक्षा समितीच्या माध्यमातून गावातील सर्व मोबाईलधारकांना दैनंदिन फोनवरून माहिती दिली जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून संदेश प्रसारीत करून ग्रामस्थांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.