संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:17+5:302021-06-16T04:32:17+5:30

जयसिंगपूर : येथील अकरावी गल्लीत बेशिस्त पार्किंग होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : येथील अकरावी गल्लीत बेशिस्त पार्किंग होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिसरात दवाखाने आहेत. त्यामुळे रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना बेशिस्त लावलेल्या वाहनांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीवर पालिकेने दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.

----------------------

रस्ता डांबरीकरण करा

शिरोळ : येथील नृसिंहवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यात चर पाडण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील या चरीमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या चरी बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

---------------------

जुगूळ-आलास रस्त्याची दुरवस्था

बुबनाळ : आलास ते जुगूळ (कर्नाटक)कडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन राज्यांना जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. त्यामुळे या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Brief news