संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:27 IST2021-08-14T04:27:42+5:302021-08-14T04:27:42+5:30

इचलकरंजी : येथील डीकेएएससीमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन व ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : येथील डीकेएएससीमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन व डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विजय यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. व्ही.पी. पाटील, ग्रंथपाल आर.एस. चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. अतिश पाटील यांनी आभार मानले.

आधार कार्ड मोबाइल लिंकिंग योजना

इचलकरंजी : भाजपच्या वतीने येथील विकासनगर भागात आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंकिंग योजना राबविण्यात आली. भारत सरकार, पोस्ट खाते व भाजप पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. दोन दिवसांच्या शिबिरामध्ये ४०० हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शहराध्यक्ष अनिल डाळ्या, संजय नागुरे, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Brief news