संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:05+5:302021-07-16T04:18:05+5:30

जयसिंगपूर : येथील रोटरी क्लबचे रुस्तुम मुजावर यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड झाली. ग्रीन सिटी जयसिंगपूर, रोटरी क्लब शिरोळ, रोटरी ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : येथील रोटरी क्लबचे रुस्तुम मुजावर यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड झाली. ग्रीन सिटी जयसिंगपूर, रोटरी क्लब शिरोळ, रोटरी क्लब कुरुंदवाड, रोटरी क्लब हातकणंगले व रोटरी क्लब शिरोळ हेरिटेज या पाच क्लबसाठी एक वर्षाकरिता ही निवड करण्यात आली आहे. मुजावर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर मुजावर यांचा रोटरीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

फोटो - १५०७२०२१-जेएवाय-०४-रुस्तुम मुजावर

-

-

फिरोज मुजावर यांची निवड

यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य फिरोज मुजावर यांची सरपंच सेवा महासंघाच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाचे संस्थापक व राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे-पाटील यांनी निवडीचे पत्र दिले. याप्रसंगी राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, माधवराव गंभीरे, बाळासाहेब म्हस्के, चंद्रकांत बधाले, राहुल उके, राज्य महिला उपाध्यक्ष वंदनाताई गुंजाळ, आण्णासाहेब जाधव, हनुमंत सुर्वे, रामनाथ बोराडे, ज्योती ओगड, पंजाबराव चव्हाण, भाऊसाहेब गिराम उपस्थित होते.

फोटो - १५०६२०२१-जेएवाय-०५-फिरोज मुजावर

Web Title: Brief news