संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST2021-07-15T04:17:28+5:302021-07-15T04:17:28+5:30

शहापूर : कोरोची (ता. हातकणंगले) येथे शासनाच्या अध्यादेशानुसार घरफाळा व पाणीपट्टीमध्ये दिव्यांगांना ५० टक्के सवलत मिळावी. तसेच सन २०२१-२२ ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

शहापूर : कोरोची (ता. हातकणंगले) येथे शासनाच्या अध्यादेशानुसार घरफाळा व पाणीपट्टीमध्ये दिव्यांगांना ५० टक्के सवलत मिळावी. तसेच सन २०२१-२२ मधील पाच टक्के निधी दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावा, यांसह विविध मागण्यांचे निवेदन सावली दिव्यांग संस्थेने ग्रामसेवक राजू जाधव यांना दिले. शिष्टमंडळात राजकुमार गेजगे, कल्लाप्पा कुरुंदवाडे, शीतल माने, गीता कांबळे, अनिता माने, आदींचा समावेश होता.

आरोग्य किटचे वाटप

अब्दुललाट : सांगोलामधील डॉ. आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेने येथील ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या सात गावांतील नागरिकांना आरोग्य किट दिले. यावेळी उपसरपंच छाया शेळके, अण्णा कचरे, स्वप्निल सांगावे, संजय शेडबाळे, मिलिंद कुरणे, प्राजक्ता ढोले, अमोल कदम व नीता आवळे उपस्थित होते.

Web Title: Brief news