संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:24+5:302021-07-14T04:29:24+5:30
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता शोधावा ...

संक्षिप्त बातम्या
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता शोधावा लागत आहे. तर अनेक वाहनांमुळे खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर जात असल्याने वादावादीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
उसावर तांबेरा
शिरोळ : तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ग्रामीण भागात वैरणीसाठी उसाचा पाला काढला जातो. मात्र, उसावर तांबेरा पडल्यामुळे ओल्या वैरणीचा प्रश्नही उद्भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
संभाव्य महापुरामुळे शेतजमीन पडिक
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील शेती बागायत म्हणून ओळखली जाते. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्यांमुळे तसेच तालुक्यातील राजाराम, शिरोळ, तेरवाड बंधाऱ्यांमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असते. सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन रिकामी ठेवली आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नुकसान होण्यापेक्षा शेतजमीन पडिक ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीला मंडईचे स्वरूप आले आहे. पालिका प्रशासनाकडून वारंवार याठिकाणी सूचना देऊनही भाजीविक्रेते याठिकाणी भाजी विक्रीसाठी बसत आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील भाजी विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.