संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:17+5:302021-07-08T04:16:17+5:30

इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे स्थानिक विकास निधीअंतर्गत आमदार प्रकाश आवाडे यांच्या निधीतून २० लाखांचा निधी मंजूर झाला ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे स्थानिक विकास निधीअंतर्गत आमदार प्रकाश आवाडे यांच्या निधीतून २० लाखांचा निधी मंजूर झाला असून, मुकुंदनगर व श्रीनगर परिसरातील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाला. या वेळी स्वप्निल आवाडे, राजेंद्र पाटील, चंद्रकांत चौगुले, आदी उपस्थित होते.

गॅस अनुदान त्वरित द्या

इचलकरंजी : कोरोनामुळे स्थगित केलेले गॅस अनुदान त्वरित मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या उद्योग-व्यापार विभागाने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सामान्य घटकांतील लोकांना केंद्र सरकारने आधार देण्याची गरज होती. मात्र, केंद्र सरकारने एलपीजी गॅस अनुदान बंद केले आहे. तरी गॅस अनुदान द्यावे. शिष्टमंडळात हुसेन मुजावर, सचिन भुते, योगेश चौगुले, सुभाष मालपाणी आदी उपस्थित होते.

Web Title: Brief news