कोल्हापूर : जगावर आलेले कोरोना संकट दूर व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या वतीने आज शनिवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन दुर्गासप्तशती पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या यू ट्युब चॅनेलवर हे ऑनलाईन प्रक्षेपण असणार आहे. तरी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
---
ॲड. उज्वला कदम यांची शोकसभा
कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी झालेल्या शोकसभेत कोल्हापूर जिल्हा शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी अध्यक्षा ॲड. उज्वला कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
.यावेळी मान्यवरांनी कदम यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे असे मत व्यक्त केले. यावेळी दिलीपकुमार जाधव, संभाजी जगदाळे, संग्राम माने, प्रा. टी. एस. पाटील, दमयंती कडोकर, रवी जाधव, प्रकाश शिंदे, मोहन पाटील, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
--
गोखले कॉलेजतर्फे कॅम्पस
कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजतर्फे इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी बीए, बीकॉम, बीबीएम, बी.एसस्सी, बीसीए, बीबीए च्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
या मुलाखतीसाठी २०२०-२१ या शैक्षणिक तृतीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी पात्र असतील. ही मुलाखत ऑनलाईन घेतली जाणार असून त्यासाठी ७ मे पर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी www.gkgcollege.com या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. के. पाटील व एस. आर. घाटगे यांनी केले आहे.
---