शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:22 IST

Hasan Mushrif Kolhapur- ब्रिक्स कंपनी आपल्या काळातील सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यास तयार आहे. त्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ही देणी लवकरच अदा केली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

गडहिंग्लज : ब्रिक्स कंपनी आपल्या काळातील सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यास तयार आहे. त्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ही देणी लवकरच अदा केली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.केवळ शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच लोकप्रतिनिधी या नात्याने १० वर्षे मुदतीने गडहिंग्लज कारखाना सहयोग तत्वावर चालवायला घेण्यास आपण कंपनीला तयार केले. ३० सप्टेंबर,२०१३ अखेर कारखान्याने ताळेबंदात दाखवलेल्या ८३ कोटी देयकांपैकी ४३ कोटी देयके शासनाने मान्य केली. बाकीची रक्कम सत्य-असत्यता (डु-डिलिजन्स) पडताळणीसाठी समिती नियुक्त केली आहे.

कंपनी येण्यापूर्वी कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या क्लोजर नोटीसीची माहिती कंपनीच्या निर्दशनास आणली नव्हती.त्यामुळे नाईलाजास्तव ८ कोटी ८२ लाख ३५ हजार रुपये अदा करावे लागले.हंगामी व रोजंदारीवरील नोकरांना कायम करावे आणि फिटमेंटच्या मागणीसाठी गेटवर आंदोलन करून कंपनीची बदनामी करण्यात आली.तरीदेखील करारात नसलेली युनियन बँकेची ३ कोटी व स्टेट बँकेची साडेपाच कोटींची देणी अदा करून कंपनीने संचालक मंडळाच्या गळ्याचा फास सोडवला.करारानुसार सभासदांना दरवर्षी १०किलो साखर द्यायची होती. परंतु, कंपनीने दरवर्षी १०० व ५० किलो साखर देऊन ८ कोटी ४१ लाख ८६ हजाराचा भुर्दंड सोसला. गळीत वाढविण्यासाठी ८ कोटी ९७ लाख खर्चून मशिनरीचे आधुनिकीकरण केले. एकंदरीत या सर्व बाबींवर कंपनीने आतापर्यंत करारामध्ये अंतर्भूत नसतांनाही ३४ कोटी ७१ लाख २१ हजार इतका खर्च केला.ऊस उत्पादकांची एफ. आर.पी, तोडणी - वाहतूक बीले, कामगारांचा पगार कंपनीने वेळेवर दिला.तरीदेखील कंपनीस कारखाना चालविणे अशक्य करून टाकले आहे. त्यामुळे यापूर्वीच आपण संचालक मंडळास धोक्याचा इशारा दिला आहे,असेही त्यांनी पत्रकांत नमूद केले आहे.जबाबदारी कारखान्याचीच...!८३ कोटीच्या देणीमध्ये कारखान्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोणतीही देणी ताळेबंदात दाखवलेली नाहीत.त्यामुळे लवाद म्हणूनसाखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्तांची थकित रक्कम देण्याची जबाबदारी कारखान्याचीच आहे, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले आहे.कारखान्याच्या भवितव्याची काळजी५००० टन गाळप क्षमता,सहवीज व इथेनॉलची निर्मिती करणारा कारखानाच साखर व्यवसाय टिकू शकतो.गडहिंग्लज कारखान्याची मशिनरी अत्यंत जुनी असून कारखाना सातत्याने बंद पडतो.मुळातच प्रतिटन ५०० ते ६०० रूपयांनी कंपनी तोट्यात आहे. त्यामुळे कंपनी कारखाना सोडून गेली तर मोठे नुकसान होईल.त्यामुळे तालुक्यातील एकमेव असणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाच्या भवितव्याची आपणांस काळजी वाटते, असेही मुश्रीफांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर